धाराशिव (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन दि.18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या शिबिरात 51 शिवप्रेमींनी रक्तदान केले तर 75 नागरिकांनी रक्त तपासणी करून शिवरायांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील बोंबले हनुमान चौकात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान व रक्त तपासणी शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, संस्थेचे अध्यक्ष मनोज मुदगल,अनंत उंबरे, सचिन तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादनाने करण्यात आले. यावेळी महिला, पोलीस व नागरिकांनी रक्तदान केले. रक्त संकलन सह्याद्री ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आले. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ शशिकांत करंजकर, भीम मलकुनाईक, ओंकार ढवळे, आदित्य साळुंखे भागवत डांगोडे, राकेश पावरा यांच्यासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले. तर रक्त तपासणी राणी लक्ष्मीबाई पॅरामेडिकल कॉलेजचे अध्यक्ष आदित्य खुणे, सुप्रिया सुतार, तेजल वाकुरे, वैष्णवी यादव, कल्याणी सोनटक्के, इब्राहिम शेख, ज्ञानेश्वर झोंबाडे, प्रथमेश मगर, अनिकेत मोरे, राहुल पवार यांच्यासह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रक्त तपासणी केली. यावेळी  डॉ. पद्मसिंह पाटील सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, नंदकुमार पडवळ, राहुल नायकवाडी, चंदन नागरगोजे, अजिंक्य मुदगल, प्रमोद मुदगल, गणेश मुदगल, अण्णा गपाट,उल्हास उंबरे,राजुदास आडे, अनिल वाघमोडे, शितल देशमुख, अजमुद्दीन शेख, कुंदन नागरगोजे, केशव भदे, बाळू आचार्य, विनोद पवार, अमोल जोशी, सुर्यकांत जगदाळे, सुनिता नाईकवाडी, ललिता नाईकवाडी, अपेक्षा खांडेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top