भूम (प्रतिनिधी)- शेकापूर येथे हजरत गैबी पीर बाबा रहेमुतुल्लाह अलैह यांच्या संदल निमित्त केजीएन ग्रुप संदल कमिटी व मोईज सय्यद मित्र मंडळाच्या वतीने कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कव्वाल शाहेद अजमेरी व कव्वाला परवीन अजमेरी यांचा कव्वालीचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोईज सय्यद, रैशोददीन शेख, ताहेर पटेल, उमेश गोरे, राजाभाऊ सुके,सादिक शेख,मुशरफ सय्यद,फिरोज शेख,अजिज पठाण, संजय गायकवाड, सादिक सय्यद,अमर बादेला, प्रमोद हिवरे, अयसल शेख, मुनवरअली पठाण हादिस शेख, युसूफ सय्यद, उमेद शेख, रमजान सय्यद यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधवांसह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top