तुळजापूर (प्रतिनिधी)- पठाडे कुटुंब देवदर्शनासाठी तुळजापूर येथे आल्यानंतर गाडीमधील वायरिंग स्पार्क होऊन पेट्रोल गाडी असल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना आज दि 8 फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास तुळजापूर शहरातील कार पार्किंग येथे सदर घटना घडली .सदर आग लागल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने जमा होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते .पाणी विक्रेते टँकर व काही वेळाने अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली .व आग आटोक्यात आणली यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून गाडीचे मात्र नुकसान झाले आहे .

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार गणेश पठाडे राहणार नीलगव्हाण तालुका माजलगाव जिल्हा नाशिक हे आपल्या कुटुंबासोबत श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी स्वतःची स्विफ्ट गाडी क्रमांक एमएच 41 बीएल 9471 तुळजापूर येथे आले होते .तुळजापूर येथे आल्यानंतर  घाटशील रोड कार पार्किंग दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट गाडी ही गरम झाली असल्यामुळे गाडी मधील वायरिंग स्पार्क झाल्यामुळे गाडीला प्रचंड आग लागली .पाहता पाहता आगीने गाडीला पेट घेतल्यामुळे नागरिकासह भाविक यांची गर्दी झाली .स्थानिक नागरिकांनी तत्काळीत अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती दिल्यानंतर तसेच शहरातील पाणी विक्रेता टमटम व अग्निशामक दलाने सदर आग आटोक्यात आणली .या आगीमध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही .पठाडे कुटुंब हे आपल्या कुटुंबासह दोन पुरुष दोन महिला व लहान मुले असे देवदर्शनासाठी आले होते .याबाबत सदर घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशावरून तत्काळीत पोलीस हवालदार अरुण शिरगिरे हे घटनास्थळी दाखल झाले .सुदैवाने पठाडे कुटुंब सुखरूप आहे.

 
Top