धाराशिव (प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलने यावर्षीही राष्ट्रीय मुख्य स्कॉलरशिप म्हणजे केंद्र सरकार व राज्य शासनाचा वतीने आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षेत  91 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

स्कॉलरशिप व राष्ट्रीय मुख्य स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापन करणारे अध्यापक राजेंद्र जोगदंड, शंकर माकणीकर, शरद क्षीरसागर, दयानंद शिराळ, अमोल देवकुळे, श्रीमती वर्षा तुळजापुरे, अर्चना देशमुख, मनिषा धावणे  यांच्या अथक प्रयत्नांमुळे यश मिळाल्याबद्दल या अध्यापकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील आदींनी अभिनंदन केले.


 
Top