भुम (प्रतिनिधी )-भूम तालुक्यातील पाथरूड येथे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य शिवजन्म उत्सवाचे आयोजन केले असून, दिनांक 18 फेब्रुवारी वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 104 युवकांनी रक्तदान करून,सामाजिक बांधिलकी जपली.

सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे तहसीलदार श्री जयवंतराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पात्रुड सज्जाचे तलाठी श्री संकेत काळे उपस्थित होते,रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून पात्रुड येथील शिवप्रेमींनी शिवजयंतीच्या निमित्ताने केलेल्या रक्तदानाचा अभिनव संकल्प इतर युवकांसाठी आदर्शवत असल्याचे मत तहसीलदार श्री जयवंतराव पाटील यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटी यांच्यासह सर्व शिवप्रेमीसह,गावकऱ्यांनी प्रयत्न केले.

 
Top