धाराशिव (प्रतिनिधी)-छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व MKCL आणि जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय धनंजय जेवळीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली गड किल्ल्याचे संवर्धन व त्याची स्वच्छता याबाबत नागरिकांना व विद्यार्थ्यांना संदेश मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नळदुर्ग येथील किल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेमध्ये किल्ल्यावरील प्लास्टिक, खाऊन टाकलेले कागद ,प्लास्टिक कॅरीबॅग, वाढलेले गवत काढण्यात आले. सर्व जमा झालेला कचरा हा घंटागाडी मार्फत किल्ल्यावरून बाहेर नेण्यात आला. स्वच्छता करण्यासाठी धाराशिव शहर मधील मिनाक्षी कम्प्युटर्स, आयडियल कम्प्युटर्स, ग्लोबल कम्प्युटर , तुळजाभवानी कम्प्युटर, SIIT कम्प्युटर, सरस्वती कम्प्युटर, विराज कम्प्युटर, ज्ञानाई कम्प्युटर  इतर केंद्र प्रमुख व केंद्रातील सारथी संस्थे अंतर्गत शिकणारे  100 पेक्षा अधिक विद्यार्थी या उपक्रमासाठी उपस्थित होते.

 
Top