तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे संविधान गौरव महोत्सव सुरू असुन महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन भित्तिपत्रिका तुतारी अंकाचे प्रकाशन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते करण्यात आले,सदर अंकामध्ये संविधानातील मार्गदर्शक तत्त्व, हक्क आणि कर्तव्य,बहुजनांविषयीचे कायदे, महिला सक्षमीकरणासाठीचे उपाय योजना, हिंदू विवाह, पुनर्विवाह आदि विषयांवर विद्यार्थ्यांनी लेखाच्या माध्यमातून अंकामध्ये मांडणी केली.यावेळी प्राचार्य डॉ पवार म्हणाले की,तरुण पिढी मध्ये संविधानाच्या प्रति जागरुकता येणे गरजेचे आहे,कारण किमान स्वतःचे अधिकार आणि देशाप्रती असलेली स्वतःची जबाबदारी काय आहे हे या महोत्सवाच्या माध्यमातून समजेल.या उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी पोषक आणि नियामक वातावरण निर्माण होईल म्हणून या कार्यासाठी तरुण तरुणींनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.अंकासाठी कु गायकवाड वंदना,बी.ए तृतीय कु.सिध्दगणेश प्रतिक्षा,बी.ए तृतीय अनिकेत जेटीथोर,बी.ए तृतीय,भांगे ओंकार,बी ए भाग तृतीय,करवर आदित्य,बी ए द्वितीय,शिंदे किरण बी.ए द्वितीय, दोन या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.याप्रसंगी डॉ बापूराव पवार,रासेयो विभाग प्रमुख प्रा व्ही एच चव्हाण, डॉ.मंत्री आर आडे,,प्रा अमोल भोयटे, डॉ बालाजी कराडे,प्रा डॉ.नेताजी काळे,प्रा डॉ आनंद मुळे,प्रा निलेश एकदंते डॉ.एफ एम तांबोळी यांच्या सह सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते, सूत्रसंचालन प्रा बी जे कुकडे यांनी केले तर आभार राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ आबासाहेब गायकवाड यांनी केले.