धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांना पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थिती लावणार आहेत. यासाठी ते 19 व 20 फेब्रुवारीला धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. दरम्यान धाराशिवला ते सोलापूरहून बसमधून प्रवास करत येणार आहेत.

सायंकाळी 5 वाजता सोलापूर बस आगारातून सरनाईक एसटी बसने धाराशिवकडे निघणार, सायंकाळी 6 वाजता धाराशिव येथे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी 7 वाजता धाराशिव येथून कळंबला स्वागत समारंभास जातील. रात्री 8 वाजता कळंब येथील शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाला उपस्थिती असेल. शिवसेना तालीम संघाच्या शिवजयंती उत्सवात उपस्थिती लावणार. रात्री 8.45 वाजता बस आगार कळंबची पाहणी करून सोलापूरकडे मुक्कामासाठी जाणार आहेत. 20 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजता सोलापूर येथून पुन्हा पालकमंत्री सरनाईक तुळजापुरला येतील. तुळजाभवानी मातेचे कुटुंबासोबत दर्शन व महापूजा झाल्यावर मंदिरामधील गाभाऱ्यातील दगडांना तडे गेल्य संदर्भात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार. 

 
Top