धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी धाराशिव, येथील आर.पी. औषध निर्माणशास्त्र युवक महोत्सव चॅम्पियन्स अरेना 2025 ची सुरुवात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.इकबाल शहा व सोजर कॉलेज ऑफ फार्मसी बार्शी चे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंह पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.चॅम्पियन्स अरेना 2025 च्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मैदानी खेळांच्या व चेस कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चॅम्पियन्स अरेना 2025 च्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे शिवजन्मोत्सव  सोहळा 2025 आयोजन करण्यात आले. या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये कुठलाही डॉल्बी व डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्य व पारंपारिक वेशभूषेमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रतापसिंह पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी, कुलस्वामिनी नॅचरल शुगरचे चेअरमन बिभीषण भीमराव नवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या वेळी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे  जीवन कार्याविषयी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून  आपल्या आयुष्याची यशस्वी वाटचाल करावी असेही आवाहन मान्यवरांच्या वतीने करण्यात आले. यावेळी बोलत असताना अंतिम वर्ष बी.फार्मसी ची विद्यार्थिनी कु. प्रणिता फाटक कु. भावेश्री वानखेडे कु. महादेवी वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यासोबतच अंतिम वर्षाचा विद्यार्थी ऋषी डोंगरे यांनीही महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. या शिवजन्मोत्सव सोहळा 2025 मध्ये आर. पी. औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी एक संकल्प केला की यापुढे शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करण्यात येईल! शिवजन्मोत्सव सोहळा 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या गडकोट किल्ले व त्यांचे मावळे यांच्या  विषयीची माहिती देखाव्याच्या रूपामध्ये भरण्यात आलेली आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.अविनाश शेरखाने कुमार ऋषी डोंगरे कु. अनंत ढेकळे, कु. निशांत शिंदे व त्याचे सहकारी  यांनी अहोरात्र मेहनत घेतली. मैदानी खेळाच्या स्पर्धांसाठी प्रा. मुझकीर पठाण यांनी परिश्रम घेतले. चॅम्पियन्स अरेना 2025 च्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 
Top