धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी अमली पदार्थ किंमत 2 लाख 50 हजार तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10 लाख 75 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी तामलवाडी टोल नाक्यावर पकडले.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ विक्री करणारे इसमांवर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे आणणार अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर -तुळजापूर महामार्गावर गस्त केली.  तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटर कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली. तसेच कारमध्ये तीन इसम बसलेले दिसून आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचेकडे एमडी हा अम्ली पदार्थ असल्याचे सांगितले. त्यांनी एमडी हा अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ किंमत 2 लाख 50 हजार रूपये तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेले इसमांची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग अशी असून सदर इसमांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इस्मविरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे धाराशिवचे सपोनि सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक शेख यांच्या पथकाने केली आहे.


एमडी अमली पदार्थ धंदा करणारा खरा आका पकडा !

तिर्थक्षेञ तुळजापूरात अमली पदार्थ विक्रीसाठी आणणारे पोलिसांचा हाती लागले असुन यांचा ख-या आका पर्यत पोहचुन पोलिसांनी त्यास जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

 
Top