धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील येरमाळा येथील मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लहू बारकुल यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. तसेच संघाच्या उपाध्यक्षपदी अजय बेदरे व सचिव म्हणून बालाजी बारकुल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार संघाचे सचिव संतोष जाधव, राजाभाऊ वैद्य, कळंब तालुकाध्यक्ष विलास मुळीक, धाराशिव तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी पार पडल्या. यावेळी येरमाळा मराठी पत्रकार संघाच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा सचिव संतोष जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ वैद्य, मुळीक, सुभाष कदम यांनी केला. यावेळी प्रमोद पाटील, सचिन पाटील, संदीप बारकुल, नितीन बारकुल, नागेश तोडकरी, निलेश बारकुल, कुंदन कांबळे, समाधान बारकुल, धनंजय बारकुल, सुभाष बारकुल, रंजीत बारकुल आदी उपस्थित होते.