धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील देशपांडे जवळील नगरपरिषद कचराकुंडी मधून सतत दूर येत असल्याने नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात समस्त धाराशिव शहरवासी यांच्या वतीने 10 फेब्रुवारी रोजी देशपांडे स्टँड जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन दि. 5 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव शहरातील नगरपरिषद च्या कचरा कुंडी मधुन सतत धुर निघत आहे. सतत धुर निघत असल्या कारणाने तेथील सर्व नागरिकांस, लहान मुलांना व वृध्दांना खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असुन, धुराच्या वासाने श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच अनेक प्रकारचे धुरामुळे आजार होत आहे. सततच्या धुरामुळे नागरिक त्रस्त झालेले असुन कचराकुडीच्या आसपासच्या भाग उमर मोहल्ला, ख्वॉजा नगर, गणेश नगर, दरगाह रोड, तालिम गल्ली, बस डेपो परिसर, आयुर्वेदिक महाविदयालय परिसर, अहिल्याबाई होळकर चौक, आगड़ गल्ली, येथिल सर्व नागरिकांना, लहान बालकांना व वृध्दांना या नगरपरिषद कचरा कुंडीच्या नगरपरिषद च्या गलथान कारभारामुळे नाहक त्रास्त सहन करावा लागत आहे.
तरी मा. साहेबांनी नगरपरिषदच्या कचरा डेपुचे लवकरात लवकर धुर बंद करण्यात यावे व नारपरिषदच्या कचरा डेपुचे लवकरात लवकर स्थलांतर करून शहराच्या 10 की. मी. लांब अंतरावर नेण्याची वेव्यस्था संबंधीत प्रशासन व अधिकारीऱ्यांनी करावी. तरी होणाऱ्या नागरिकांच्या तब्येतिस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी.
तरी लवकरात लवकर जर प्रशासन व संबंधीत अधिकाऱ्यांनी त्यांची व्यवस्था न केल्यास सदर सर्व भागांतील सर्व नागरिकांकडून धारासुर मर्दिनी मंदीर कमान जवळ रास्ता रोको आंदोलन दिनांक 10/02/2025 रोजी, वार : सोमवार रोजी करण्यात येणार आहे. याची दखल संबंधीत प्रशासनाने घ्यावी. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर शेख आयाज, अभय इंगळे, कादर खान पठाण, गणेश खोचरे, रवी वाघमारे, खलिफा कुरेशी, वाजिद पठाण, इस्माईल शेख, काझी एजाज, बाबा मुजावर, बिलाल तांबोळी, अनवर शेख, शेख इब्राहिम, भारत कोकाटे, फरमान काझी, गयास मुल्ला, शेख आतिक, संकेत साळुंखे, इस्माईल काझी, हसीब काझी , मोहसीन सय्यद, इम्रान खान मुजीब काझी, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या यावर स्वाक्षऱ्या आहेत.