भूम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम येथील समाजशास्त्र विषयाच्या प्रा. तानाजी रामभाऊ बोराडे यांना श्री. जगदीश प्रसाद झांबरमल टिबड़ेवाला विश्वविद्यालय, विद्यानगरी, झुंझुनूं, राजस्थान द्वारा “महात्मा फुले सामाजिक विचारवंत: एक चिकित्सक अभ्यास“ या विषयावर पीएचडी प्रदान करण्यात आली.
डॉ.जाधव सुनिल महादेव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करुन हा शोध प्रबंध प्रा. तानाजी बोराडे यांनी विद्यापीठास सादर केला होता. या विषयावर त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना प्रदान करण्यात आलेल्या पीएचडी बद्दल विद्या विकास मंडळ पाथरुडचे पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धव निवृत्ती बोराडे, उपाध्यक्ष दत्तात्रय देविदास बोराडे, सचिव मुरलीधर भाऊराव काटे, उपसचिव तथा प्राचार्य संतोष सुखदेव शिंदे आदीसह सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रा. तानाजी बोराडे यांचे अभिनंदन केले.