भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील मौजे हांडोग्री येथे वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट च्या माध्यमातून इंण्डस्इंड बँक अंतर्गत संपदा ट्रस्ट वॉटर मार्फत उमेद जय भवानी महिला बचत गटांला 50 टक्के सवलतीवर खवा युनिट मशीन देऊन खवा प्रक्रिया उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. संपदा ट्रस्टचे संचालक आणि अनिरुद्र मिरीकर, सरपंच उल्का मगर, वॉटर शेड ऑर्गनाइसचे कांतीलाल गीते, पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्ताप्पा तळेकर, ग्रामसेविका नीलम जानराव, संदीप मगर, उपसरपंच रवींद्र लोमटे उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
यावेळी संपदा ट्रस्टचे संचालक अनिरुद्ध मिरिकर यांनी मार्गदर्शन केले. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जय भवानी महिला बचत गटांनी या अत्याधुनिक खवा युनिट तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त नफा कमवावा. तसेच वॉटरचे कांतीलाल गीते यांनी देखील या हांडोग्री गावांसाठी पाणी अडवा पाणी जिरवा व पाणी वाचवा यासाठी देखील प्रयत्न करून बंधारे बांधले आणखीन शेतकऱ्यांना पाण्यासाठी सुक्ष्म नियोजन करू असं आश्वासन दिले. तसेच वर्षा चव्हाण मॅनेजर सेल्फ यांनी देखील गटातील महिलांनी एकत्र येऊन छोटे छोटे बिझनेस करुन आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे संबोधीत केले. तर उमेदचे तालुका व्यवस्थापक मनोज कवडे यांनी महिलांना दशसुत्रीचे संकल्पनावर उद्योजक तयार व्हावे. यासाठी शुभेच्छा दिल्या. तर आभार प्रदर्शन अनिल तळेकर यांनी केले आणि कार्यक्रमाची रूपरेषा जिल्हा समन्वयक विकास गोफणे व भुम परंडा समन्वयक सुजित जगताप यांनी मांडली. या कार्यक्रमाला उपस्थित भगवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील डोके, अनिल तळेकर, अंजली कदम, कमल शिरसागर, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, प्रभाग समन्वयक विलास ढगे, उद्योजक कुलकर्णी, उद्योग सखी पार्वती साखरे, उद्योजक सागर तळेकर, प्ररेक निकिता, साखरे कमल, क्षीरसागर, शिला तळेकर, अण्णापूर्णा तळेकर, वैष्णवी तळेकर, अक्षरा कुलकर्णी, वॉटरच्या सुरेखा लोमटे, राधा मगर, विद्या भरणाळे, सुवर्णा कदम, महादेवी भरणाळे, संगीता तळेकर, लक्ष्मी तळेकर यांच्यासह गटातील महिला व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.