धाराशिव (प्रतिनिधी)- या जिल्ह्यात आयटीआयचा दर्जा व क्षमता वाढ करण्यासाठी मी सर्व सहकार्य करेन. जिल्ह्याचा मनुष्यबळ मुल्यांक वाढवण्यासाठी लवकरच महिलांसाठी स्वतंत्र आयटीआयची स्थापना करण्यात येईल. यासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जातील. येथील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासाठी मोठा पाठपुरावा केलेला आहे. असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबईचे सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे यांनी केले.

मराठवाडा विभागीय क्रीडा स्पर्धा व तंत्रप्रदर्शनाचे उद्घाटन सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील व रूपामाता उद्योग समुहाचे ॲड. व्यंकट गुंड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले.  पुढे बोलताना देवतळे यांनी या जिल्ह्यात प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जातील. येथे नव्याने होणाऱ्या उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक ते आधुनिक व्यवसाय यांना नव्याने मंजुरी दिली जाईल त्यासाठीचे प्रस्ताव संचलनालयाकडे सादर केले जातील. तसेच त्याचा पाठपुरावाही केला जाईल. असे सांगितले. रूपामाता उद्योग परिवाराचे प्रमुख ॲड. व्यंकटराव गुंड यांनी धाराशिव जिल्ह्याची उद्योगक्षम जिल्हा म्हणून नवीन ओळख निर्माण करण्यासाठी आयटीआय चे खूप महत्त्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी एकविसावे शतक आयटीआयचे आहे असे सांगितले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी आज धाराशिव जिल्ह्यात प्रथमच विभागीय क्रीडा स्पर्धा व तंत्र प्रदर्शन होत आहे. याचा मनस्वी आनंद आहे. श्री तुळजाभवानी क्रिडा संकुल येथे राष्ट्रीय अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे, निकिता पवार, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती वैष्णवी बारंगुळे, राज्याचे बुध्दीबळ प्रशिक्षक भगवान जाधव, उपसंचालक अजय शिंदे, गणवीर, अतुल केसकर, देविदास राठोड, योगेश जोशी, प्राचार्य विक्रमसिंह माने, प्राचार्य राजेश धानोरकर आदी यावेळी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण झरकर, मनोज चौधरी, पुनम जेउघाले यांनी केले. 


 
Top