धाराशिव (प्रतिनिधी)- इयत्ता 10 वी व 12 वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज यावर्षीपासून फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ही सुविधा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंधनकारक

असून जिल्ह्यातील जिल्हा,विभाग, राज्य,राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पात्रता धारक खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी “आपले सरकार“ पोर्टलद्वारे अर्ज भरून द्यावा लागेल. यासोबतच,जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कोणताही अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार नाही.त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयाने जर वेळेत अर्ज भरला नाही,तर संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य त्यासाठी जबाबदार असतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 ही आहे तरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी 31 मार्च 2025 पूर्वी “आपले सरकार“ पोर्टलद्वारे अर्ज सादर करावे.अर्ज वेळेत भरले नाहीत तर संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.त्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.

 
Top