मुरूम (प्रतिनिध)- येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रमुख अतिथी सेवानिवृत्त क्रीडा प्रमुख प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राम बजगिरे, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. सुजित मठकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आलमला, ता. औसा येथील शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दहाव्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संघाने राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक मिळवत सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख 15 हजार रुपये पटकाविले. या संघाचा कर्णधार नजीर जेवळे, माधव बिराजदार, शुभम सुरवसे, मयूर गायकवाड, संग्राम आसबे, प्रतीक राठोड, इम्रान पटेल, नबीलाल जमादार, मयूर चोथवे आदीं खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून विजय मिळविला. या योगदानाबद्दल सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, ग्रंथ भेट, फेटा बांधून व पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर खेळाडूंना प्रा. राहुल इंजे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुदीप ढंगे, प्रा. पायल आगरकर, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. अनिल मोरे, प्रा. लखन पवार, मल्लू स्वामी, अमोल कटके, किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विनंती बसवंतबागडे तर आभार प्रा. विवेकानंद चौधरी यांनी केले. याप्रसंगी विजेत्या खेळाडूंनी जल्लोष पूर्ण वातावरणात डीजेच्या तालावर आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 
Top