कळंब (प्रतिनिधी) - येथील बस स्थानक व कळंब आगाराची तपासणी आणि नवीन बसचा शुभारंभाच्या  कार्यक्रम दि . १९ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आयोजित केला होता .  याच धर्तीवर कळंब आगाराने परिसराची स्वच्छता सलग दोन दिवस राबवून केली या सर्व गोष्टीसाठी रा .प . म .  प्रशासनाने प्रादेशिक व्यवस्थापकापासून ते कळंबच्या आगारा प्रमुखापर्यंत सर्व मंडळींनी दोन दिवस आतक परिश्रम घेऊन तयारी जोरात केली होती . पालकमंत्र्याचा वेळ पण कळंब आगारासाठी अर्धा तास होता वाहक चालक यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी सज्ज झाले होते, पण साहेब येण्याची वेळ रात्री साडेआठची होती पण साहेब आले रात्री दहा वाजता साहेबांचा एवढा धावता दौरा पाहून कर्मचारी नाराज झाले . साहेब आले आणि लगेच निघून गेले साहेब येताच दीपप्रज्वलन केले नवीन बसचा शुभारंभ करून कळंब ते अक्कलकोट या नवीन बसची घोषणा केली आणि लागलीच साहेब रवाना झाले . ना कळंब आगाराची पाहणी ना  वाहक चालक यांच्या समस्या जाणून घेतल्या अडीअडचणींना साहेबांनी फाटा देत पुढील कार्यक्रमासाठी साहेब रवाना झाले . त्यामुळे व्यापारी ,प्रवासी मित्र संघटना, वाहक चालक व कर्मचारी अधिकारी यांची काहीही संवाद न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली .  जिल्ह्यासाठी व अधिकारी कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  पालकमंत्री तथा परिवहन मंत्री यांनी वेळ द्यावा अशी मागणी नागरिकात जोर धरत आहे .  या कार्यक्रमासाठी प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर ,विभाग नियंत्रक विनोद कुमार भालेराव ,यंत्र अभियंता चालक सूर्यकांत थोरबोले , विभागीय वाहतूक अधीक्षक श्री देशमुख ,कामगार अधिकारी श्री सुतार ,सुरक्षा दक्षता अधिकारी श्री नेहरकर ,भंडार अधीक्षक आनंद रत्नपारखी ,विभागीय अभियंता श्री उभाळे, कळंब चे आगारा प्रमुख एस .डी . खताळ सह आधी या कार्यक्रमासाठी अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .कार्यक्रम पार पाडण्यासाठी कळंब आगारातील वाहक चालक व यांत्रिकी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम पार पाडला .


 कळंब आगारातून परिवहन मंत्र्याच्या आदेशानुसार सकाळी सव्वा सात वाजता कळंब ते अक्कलकोट गाडी दि . २० पासून नियमित सुरू करण्यात आली आहे . या सेवेचा  प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आव्हान आगार प्रमुख यांनी केले आहे .


कळंब आगारात जुन्या एकूण ७८ बस ची संख्या असून दररोज प्रवाशांची जवळपास २७ हजार प्रवासी चढ उतार करतात त्याचप्रमाणे कळंब आगारातून एकूण ८० शेडूल हे चालवले जातात यासाठी परिवहन मंत्र्यांनी आणखी २० नविन  बसेस द्यावा अशी मागणी वाहक चालकाने केली आहे . 


शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांचे कर्जमाफी करावी व कळंब आगाराला आनखि नवीन ५० बसेस द्याव्यात व त्याचप्रमाणे प्रत्येक तीर्थक्षेत्र ठिकाणी कळंब  आगाराची बस  नाशिक शिर्डी शनिशिंगणापूर पंढरपूर हैदराबाद आदी ठिकानी सुरू करण्यात यावी अशी मागणी ॲड . मनोज चोंदे यांनी पालकमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे . 


 
Top