धाराशिव (प्रतिनिधी)-  स्टार्ट अप मार्गे उद्योगासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याचे मॉडेल असावे आणि उद्योगातील अडचणी सोडवन्यासाठी व्यवस्थापन शिक्षण गरजेचे असल्याचे पुष्पा टेक्सटाईलचे कोओनर आणि निर्यातदार उद्योजक  प्रशांत राठी यांनी प्रतिपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप परिसर धाराशिव येथील व्यवस्थापन शास्त्र विभागा मार्फत “बिजनेस 4.0” रीडीफायनिंग द फ्युचर ऑफ बिजनेस या थीमवरती दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी 2025 या दोन दिवस राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

भारताला पाच ट्रीलीयन डॉलर ईकॉनॉमिचे उदिष्टे सध्या करण्यासाठी भारतीय बिजनेसचे योगदान महत्वाचे राहणार आहे. यातूनच उद्योग व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याच अनुषंगाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे बीजभाषण हे गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठात कार्य केलेले आणि सध्या संजीवनी परिसरातील व्यवस्थापन विभाग प्रमुख रितेश पटेल यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय परिषद समन्वयक डॉ. विक्रम शिंदे यांनी राष्ट्रीय परिषदेच्या थीम बाबत सांगितले. व्यवस्थापन शास्त्र विभाग संचालक डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. प्रशांत दीक्षित यांचेही भाषण झाले.

पुढील सत्रात विविध संशोधकांनी आपले संशोधनपर लेखांचे सादरीकरण केले आणि विविध विद्यापीठातून आलेल्या मान्यवरांनी आपले  बिजनेस 4.0 बद्दल अभ्यासपूर्ण विचार मांडणी केली. तंत्रज्ञान मधील संधी आणि याचा बिजनेस मधील वाढता वापर आणि परिणामबाबत विस्तृत चर्चा झाली. यामध्ये पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ. श्रीराम राउत, टाटा सामाजिक संस्था येथील डॉ. नीलिमा यादवा, संजीवनी कोपरगाव येहील डॉ. विशाल तिडके, भारती विद्यापीठ सोलापूर येथील डॉ. शिवगंगा मैंदर्गी, बिल गेट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अर्षद रजवी, डॉ आनंद मुळे यांनी मार्गदर्शन केले.   

दुसऱ्या दिवशी विविध संशोधक सहभागी यांनी आपले संशोधनलेख सादरीकरण केले. या सादरीकरणाचे विश्लेषण यामध्ये डॉ. विकास हुंबे, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. पद्मप्रिया ईराबती, डॉ. राजेश शिंदे, सचिन बस्सैये, प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, अधिष्टाता प्रा. डॉ. विना हुंबे आणि डॉ. अभिजित शेळके उपस्थिती होते. सदर परिषद यशस्वी करण्यासाठी विभागातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे महत्वाचे योगदान दिले.        

 
Top