धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिर आयोजन करण्यात आले.
डॉ. मनिषा असोरे, विभागप्रमुख, शिक्षणशास्त्र विभाग तथा पिठासन अधिकारी, अंतर्गत तक्रार समिती, विद्यापीठ उपपरिसर, धाराशिव यांनी अध्यक्ष स्थान भूषविले. वसंत यादव, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, धाराशिव यांनी प्रमुख अतिथी म्हणुन मार्गदर्शन केले. ॲड. अमोल गुंड, मुख्य न्यायरक्षक ॲड. शुभम गाडे, सहाय्यक न्यायरक्षक आणि ॲड. स्मिता कोल्हे, सदस्या अंतर्गत तक्रार समिती आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी वसंत यादव, यांनी विधी सेवा प्राधिकरणा मार्फत निशुल्क उपलब्ध सेवे बाबत मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्येवर उपाय योजना सुचविली. ॲड. अमोल गुंड, मुख्य न्यायरक्षक, धाराशिव यांनी पोक्सो कायदा या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण, प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा, विद्यापीठ अनुदान आयोग, अधिनियम 2 मे,2016 नुसार कायदा या विषयावर ॲड. शुभम गाडे, सहाय्यक न्याय रक्षक, धाराशिव यांनी पॉश ऍक्ट 2013 या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पिठासन अधिकारी डॉ. मनिषा असोरे यांनी विधी सेवेविषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दिक्षित यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. कार्यक्रमास अंतर्गत तक्रार समितीचे सचिव, विश्वास कांबळे, सदस्य विद्याधर गुरव, डि. आर. देशमुख, सदस्या अंतर्गत तक्रार समिती हे उपस्थित होते. डॉ. एस. एस. मोले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. सदरील कार्यक्रमासाठी विद्यापीठ उपपरिसरातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.