तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची  कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी  मातेच्या मंदिरात   वस्रसंहिता लागू करण्याची मागणी  महाराष्ट्र मंदिर महासंघ  ने अध्यक्ष, श्री तुळजभवानी देवस्थान मंदिर यांना निवेदन देवुन केली आहे.

महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केर्ली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, खाजगी अस्थापने, न्यायालये, पोलीस खाते, राज्य परिवहन मंडळ (एस.टी.) आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे.

.मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे', असे निर्देश माननीय न्यायालयाने दिले आहेत. भारतीय वस्त्र पाश्चात्त्यांच्या तुलनेत अधिक सात्त्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत. तसेच  . तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपारिक वस्त निर्मिती करणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल..  महाराष्ट्रातील ५५० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे आणि अनेक मंदिरे वस्त्रसंहिता लागू करण्याच्या तयारीत आहेत.  असे निवेदन संयोजक किशोर गंगणे  अँड. शिरिष कुलकर्णी श् विनोद रसाळ, यांनी दिले सदरील निवेदन प्रत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस यांना सादर केले आहे.

 
Top