धाराशिव प्रतिनिधी - कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांची एनसीटीई मान्यता प्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.व्ही.आर्या यांनी त्यांना दिले आहे.

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असून एनसीटीईने मान्यता दिलेल्या बी.एड.,बी.पी.एड.एम.एड.,डी.एड. या शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या संदर्भात एनसीटीई व मान्यता प्राप्त अध्यापक विद्यालय महाविद्यालय यांच्यात समन्वय साधण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. राज्यातील जवळपास साडेचारशेच्या आसपास अध्यापक विद्यालये व दीडशे पेक्षा जास्त अध्यापक महाविद्यालय यांची प्रवेश प्रक्रिया, इतर सर्व एनसीटीईशी संबंधित बाबी या करिता ही संघटना काम करते.देशातील सर्व राज्यातील संघटना कार्यरत असून जवळपास 20 हजारापेक्षा जास्त अध्यापक विद्यालये व महाविद्यालये या संघटनेशी संलग्न आहेत.

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात

१७ वर्षापासूनकार्यरत असलेले भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस व्ही.आर्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुदर्शन कदम यांच्यासह अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

 
Top