धाराशिव (प्रतिनिधी) - येथील‌ समता नगरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ११ या शाळेतील विद्यार्थ्यांनी व क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.

धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ११ मधील विद्यार्थिनी खोखो स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच थ्रो बॉल स्पर्धेत मुलींच्या संघाने द्वितीय व क्रिकेटमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात आलिया फारुख मुजावर हिने १०० मीटर धावण्याच्या प्रथम तर मोठ्या गटात ऐश्वर्या राम घोडके या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तस्मिया फारूक मुजावर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

या यशाबद्दल नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी तथा उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए ए लावंड, मार्गदर्शक शिक्षक बी.यु. शेंडगे, डी एम खारे, जे पी अडसुळ, के के पवार, ए डी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी शिक्षक यु ई जोगदंड यांचे सहकार्य मिळाले.


 
Top