तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी देविचा मंदीरातील गर्भगृहात माघ पोर्णिमा निमित्ताने आकर्षक असा फुलांचा आरास करण्यात आला होता. आज रोजी देविदर्शनार्थ खास देविभक्तांनी मोठी गर्दी केली. माघ पोर्णिमा मंगळवार दि. 11 फेब्रुवारी रोजी राञी  प्रारंभ झाली. ती बुधवार सांयकाळ संपली. आज माघ पोर्णिमा दिनी बळीराजाने आपल्या  शेतातील आलेले ज्वारी, गहु सह अन्य पिकांचे धान्य, कणस व धाट सह देवि मंदीरातील दारात ठेवले.

माघ पोर्णिमेचे छबिना, जोगवा सह धार्मिक  विधी मंगळवारी संपन्न झाले. माघ पोर्णिमा पार्श्वभूमीवर सोमवार, मंगळवार, बुधवार असे तीन दिवस राञी मंदीरात छबिना काढण्यात आला. माघ पोर्णिमा दिनी भाविकांनी श्रीगोमुख श्रीकल्लोळ तिर्थकुंडात स्नान करून ओल्या पडद्याने  श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन  घेऊन देविचरणी माघपोर्णिमा सेवा अर्पण केली.

मंगळवार माघ पोर्णिमा पार्श्वभूमीवर देविभक्तांनी देविजींचा कुलधर्म, कुलाचार मनोभावे करुन माघ पोर्णिमेची वारी देविचरणी अर्पण झाल्याचे समाधान मानून गावी परतले. आज अभिषेक, धर्म दर्शन, सशुल्क दशर्न,  मुख दर्शन रांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. राञी मंदीर प्रांगणात देविजींचा छबिना हजारो भाविकांच्या सहभागाने संपन्न झाला. माघ पोर्णिमा दिनी द्राक्ष बागेतील पहिला आलेला माल द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी देविचरणी अर्पण केला.


 
Top