भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील चिंचपुर (ढगे) येथील शिवव्याख्याते आणि प्रतिभावान युवालेखक सुजित नामदेव तांबे लिखीत “ शिवछत्रपतीः सुत्र विश्वाचं “ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी वीर बाजी पासलकर स्मारक पुणे येथे प्रखर हिंदूत्ववादी वक्ते निलेश भिसे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रमेश परदेशी, राजेंद्र बेंद्रे, युवा व्याख्याते कु. प्राजजी भिलारे, भुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विशाल ढगे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिवरायांचं व्यवस्थापन कसं होत आणि तरुणाई ने कसं वागल पाहिजे यावर हे पुस्तक लिहलेले आहे, असे लेखक सुजित तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इतिहास अभ्यासक सौरभ कर्डे, ॲड. अनिरूद्ध बनसोड, इतिहास संशोधक अशोकभाऊ पाटील, ह.भ.प. विश्वासभाऊ कळमकर, दादासाहेब दाभाडे आणि असंख्य इतिहासप्रेमी वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन केतन चौगुले यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रबोधिनीचे धर्मरक्षक राहुल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.