उमरगा (प्रतिनिधी)- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त युवांना संधी देवुन भगवा फडकिवण्यासाठी युवासैनिकांनी तयारीला लागावे. असे आवाहन युवा सेना मराठवाडा निरीक्षकांनी केले आहे. युवा विजय दौऱ्यानिमित्त उमरगा शहरातील श्री मंगल कार्यालय येथे आयोजित युवासेना बैठकी पार पडली.

यावेळी युवासेना मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, मराठवाडा युवतीसेना निरीक्षक आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, मराठवाडा युवासेना निरीक्षक आविनाश जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती संचालक सचिन जाधव, जिल्हाप्रमुख गणेश जगताप, शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, युवा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक व पदाधिकारी यांचा युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची संघटनात्मक बांधणी, युवासेनेचा विस्तार, महाविद्यालयीन शाखा तयार करणे हे या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे. 'घर तिथे शिवसैनिक, गाव तेथे शिवसेना' या संकल्पनेद्वारे गावोगावी संघटना अधिक मजबूत करण्यात येणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमात कॉमनमॅन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ' कॉमन मॅन ' दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये गजानन गायकवाड, मोहन जाधव, सचिन बिद्री, होमगार्ड दोडतले, अस्मिता सूर्यवंशी, कांबळे पोस्टमन, वाडीकर जुस सेंटर, मीनाक्षी दुबे, निसर्गप्रेमी ग्रुपचे सर्व सदस्य आदी कॉमन मॅनचा युवासेनेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. 

यावेळी युवा सेना उपजिल्हाप्रमुख भगत माळी, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, तालुका सचिव काका गायकवाड, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाले, युवा सेना शहरप्रमुख अमर शिंदे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, संदीप चव्हाण, युवराज गायकवाड, राहुल शिंदे, संजय माने, शहाजी येळीकर, रोहित पवार, मुर्तुझा मुंगले, रवी पाटील, श्रीनिवास मदनसुरे, योगेश गायकवाड, प्रदीप मोरे, योगेश गायकवाड, महादेव क्षीरसागर, विजय कदम, हैदर शेख, गजानन सूर्यवंशी, संजय पवार, ज्ञानेश्वर सांगवे, दिनेश बिराजदार, मनोज निकम, ओम जगताप, अमित माने, प्रशांत पोचापुरे आदी युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन युवराज गायकवाड व आभार प्रदर्शन अध्यक्ष चंद्रशेखर सूर्यवंशी यांनी केले.

 
Top