तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथील रहिवासी काशीनाथ सिताराम राठोड हे भारतीय सैन्य दलातून 18 वर्ष सेवा पुर्ण करुन सेवानिवृत्त झाल्या बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सर्व प्रथम गावातून वाजत गाजत काशीनाथ राठोड यांची मिरवणूक काढण्यात आली. येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, सैनिक काशीनाथ राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच सुर्यकांत चव्हाण, माजी सरपंच ज्योतिका चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या शांताबाई राठोड, कांताबाई पवार,कमळाबाई राठोड ,धानाबाई राठोड,सुभाष नाईक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, शिवाजी पोलीस पाटील, पांडुरंग चव्हाण, नेमिनाथ चव्हाण, सिताराम राठोड, माणिक राठोड,सिद्राम पवार, यशवंत राठोड, बाबुराव चव्हाण, सुभाष चव्हाण, शिवाजी चव्हाण,हरीदास राठोड,बाबु राठोड, अरुण चव्हाण, सुनील राठोड, गोविंद चव्हाण, वसंत चव्हाण,रतन चव्हाण, मोतीराम राठोड, शंकर चव्हाण, सुनील चव्हाण यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव राठोड यानी केले. तर आभार अनिल चव्हाण यांनी मानले.