तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा  ग्रामपंचायत कार्यालयाचा सन 2017 ते 2022 मध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन दोषीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, गटविकास अधिकारी यांना निवेदन देवुन दिपक सोनवणे यांनी केली आहे.

सन 2017 ते 2022 पर्यंत ग्रा.प. अपसिंगा येथे शासनाच्या वतीने किती निधी देण्यात आला. याचा तपशिल बॅकस्टेटमेंन्ट सहीत दयावा. आंगणवाडया दुरुस्त

साहित्य खरेदी, आरोग्य स्वच्छता, पाणीपुरवठा, वृक्षलागवड, दुकान भाडे, पथदिवे, पाणीपुरवठा टंचाई काळातील खर्च, मुतारी पाणीपुरवठा  व भंगार विक्रीतुन किती आले ते कुठे खर्च केले. याची सखोल चौकशी करुन दोषी आढळल्यास कारवाई करण्याची मागणी दिपक सोनवणे यांनी निवेदन देवुन केली आहे.


 
Top