तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीरातील दोन्ही महाव्दार मध्ये असलेल्या तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यातील एका स्टोअर रुमला शाँर्टसर्कीट होवुन आग लागली.  ती तात्काळ विझवल्याने वित्त व जिवित हानी टाळली. यात कागदी खपाटे जळुन काही फोटो अर्धवट जळुन किरकोळ नुकसान झाले. सदरील घटना सोमवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सांयकाळी 05.30 वा सुमारास घडली.

या बाबतीत अधिक अशी की, राजेशहाजी महाव्दार व राजमाता माँ जिजाऊ महावदार मध्ये मंदीराची तीन मजली इमारत आहे. यास धार्मिक ग्रंथालय असे नाव आहे. या इमारतीतील पहिल्या मजल्यातील स्टोअर रुम मधुन अचानक धुर येवु लागताच तात्काळ कंञाटी वायरमन सुनिल काकडे रुमच्या काचा फोडून  याने जीवावर उदार होवुन धुर येणाऱ्या खोलीत प्रवेश करुन छोटे  अग्नीशमन यंञ हातात घेवुन आत जावुन या फवा-याने आतील आग अवघ्या दहा मिनीटात विजवल्याने मोठी दुर्घटना टळली व मंदीराची वित्त हानी झाली नाही.

सदरील आग शाँर्ट सर्कीटने  5.30 लागली होती. दहा मिनीटात ती विझवली. यावेळी मंदीराचे अधिकारी लेखापाल तथा धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, धार्मिक  व्यवस्थापक अमोल भोसले, रामेश्वर वाले, अतुल ढमाले, मुख्य लिपीक जयसिंग पाटील, अभियंता अनिल चव्हाण, मार्तंड दिक्षी, विश्वास सातपुते विश्वास कदम, सचिन साळुके, गणेश नाईकवाडी सह मंदीर व स्वच्छता व सुरक्षा विभागाचे कर्मचारी यांनी ही आग विझवण्यास मदत केली.


 
Top