तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष स्वाती पवार , सदस्य सदस्य लखन रसाळ ,अश्विनी भक्ती यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांनी भाजीपाला ,विविध खाद्यपदार्थ व स्टेशनरी यांचे खूप सारे स्टॉल मांडण्यात आले होते.या स्टॉलला भेट देण्यासाठी गावातील  मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी गर्दी केलेली होती.  बाल आनंद मेळाव्यामुळे  विद्यार्थ्यांना  खरेदी-विक्री, देवाण-घेवाण, व्यवहार ज्ञान बरेच काही शिकता आले.या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांचा व्यवहार कौशल्याचा विकास आणि आनंददायी शिक्षणासाठी हा उपक्रम शाळेने राबवलेला होता.बाल आनंद मेळावा यशस्वी करण्यासाठी गोरोबा पाडुळे, केंद्रप्रमुख अनिल पडवळ, धनंजय थोडसरे, नवनाथ चंदनशिवे, बाळासाहेब कानडे, सुनिता माने, नुसरत अन्सारी, सविता राठोड, अनिता पांढरे, महानंदा शेंडगे  यांनी परिश्रम घेतले.

 
Top