तेर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या आरोग्य विभाग गरोदर महिलांना किलकारी ॲप देणार आरोग्य विषयक सल्ला देणार आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने गरोदर महिलांना वेळोवेळी आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन मिळण्यासाठी “ किलकारी“ॲप ची सोय केली आहे. गरोदर महीलेने गरोदर झाल्यानंतर आपल्या भागातील आशा स्वयंसेविका अथवा अंगणवाडी कार्यकर्ती यांच्याशी संपर्क साधून “किलकारी“ॲप मध्ये स्वतः ची आरोग्य विषयक माहिती भरावयाची आहे.आरोग्य विषयक माहिती भरल्यानंतर गरोदर महिलेला चौथ्या महीन्याच्या पहील्या आठवड्यापासून बाळ एक वर्षाचे होईपर्यंत “ किलकारी “ॲपव्दारे आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे.त्यामुळे गरोदर महिलांना व्यवस्थितरित्या स्वतः व बाळाची चांगल्याप्रकारे काळजी घेता येईल.


क़ेद्र सरकारच्या आरोग्य विभागाने चालू केलेली किलकारी  ॲप गरोदर महिलांना आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन उपयुक्त ठरणार आहे. गरोदर महीलानी आशा स्वयंसेविका किंवा अंगणवाडी कार्यकर्ती यांचीशी संपर्क साधावा.

संगिता डोलारे, पर्यवेक्षिका, आशा स्वयंसेविका,तेर 

 
Top