तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीरात श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान वतीने स्वनिधी तुन मंदीर परिसरातील जिर्णौध्दार कामे मोठ्या संखेने चालु आहेत. या कामातुन मंदीराचे पुरातन रुप उघडे होत आहे. यामुळे अनेक जुना पुरातन ठेवा भक्तांच्या नजरेस येणार आहे.

श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ मंदीरात भाविकांचा ओघ सुरुच आहे. सध्या मंदीरात भाविकांची गर्दी व जिर्णोध्दार कामाचा एकच धडाका सुरु आहे. सध्या गर्दी असल्याने सिंह व भवानी शंकर गाभाऱ्यातील कामे थांबवले असुन सध्या पिंपळ पार, टोळभैरव दरवाजा व मार्ग, श्रीकल्लोळ, गणेश ओवरी, टोळ भैरव मंदीरातुन मंदीरात प्रवेश मार्ग येथे जिर्णोध्दार कामे सुरु आहेत. जिर्णोध्दार कामासाठी मोठ्या संखेने प्रदक्षणा मार्गावर उंच असे लोखंडी बँरेकेटींग लावले असल्याने प्रदक्षिणा मार्गाची रुंदी कमी आहे. थोडे जरी भाविक असले तरी मंदीरात गर्दी दिसत व होत आहे. सध्या मंदीराला पुरातन पुर्नवैभव प्राप्त व्हावे यासाठी मंदीरावरील दगडी कामावर असणारे सिमेंट रंग थरे छन्नी हाताड्याने प्रशिक्षित कारागीर काढत आहेत. त्यामुळे सध्या मंदीरात सर्वञ दगडी धुराळा उडलेला दिसत असुन दगडावर मारलेल्या छन्नी आवाजाने मंदीरात छनछन आवाज येत आहे.

सध्या भाविकांची दर्शनार्थ प्रचंड गर्दी होत असल्याने व जिर्णोध्दार कामे चालु असताना सशुल्क दर्शन पासेस पाचशे, दोनशे रुपयाचे वितरीत करताना गर्दी पाहुन वितरीत करावे. अन्यथा पैसे देवुन ही भाविकांना दर्शनार्थ वेळ लागणार असल्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे.


 
Top