तेर( प्रतिनिधी ) धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालक सभेच्या अध्यक्षस्थानी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत हाजगुडे हे होते.तर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंकुश कोळी व  कुंडलिक कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावैळी मुख्याध्यापक बाळासाहेब कांबळे ,प्रवीण पाटील ,शिवाजी मोरे, निलावती बारस्कर ,वैशाली व्यास, मनीषा मेटे ,प्रतिभा वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी शाळेतील गुणवत्तेच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.


 
Top