उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील रामपूर गावात अयोध्या खंडू माने या राहत असलेल्या पत्र्याच्या शेडला शनिवार दि.08 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास आग लागून घरातील सर्व साहित्य जाळून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाली असतात शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या कन्या ॲड.आकांक्षा ज्ञानराज चौगुले, अध्यक्षा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उमरगा यांनी रविवार दि.09 रोजी पीडित कुटुंबीयाची भेट घेवुन संस्थेच्या वतीने तातडीची मदत म्हणून सर्व संसारोपयोगी साहित्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. नुकसानग्रस्त महिला ही तिच्या मुलीसह याठिकाणी राहत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे. शनिवारी त्या मजुरीसाठी शेतात गेल्यावर सदरची घटना घडली आहे. दरम्यान माने कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासित केले आहे. 

याप्रसंगी ज्ञानज्योती सामाजिक संस्थेचे कोषाध्यक्ष अमर देशटवार, अरुण जगताप, पोलीस मित्र संघटना जिल्हाध्यक्ष संदीप चौगुले, रामपूरच्या सरपंच जानकाबाई संतराम भोसले, उपसरपंच संतोष मनोहर भोसले, ग्रा. पं.सदस्य अनंत सुभाष भोसले, विष्णू भोसले, जालिंदर दिगंबर भोसले, राजेंद्र पवार, गुंडू भोसले, शामलबाई भोसले, दिलीप कोळी, महानंदा कोळी, रेश्मा कोळी, दत्ता कोळी,  सत्यकाला कोळी, मीना घुले, कृष्णा जमादार, सारिका कोळी, अर्जुन जाधव आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

 
Top