तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळा बारूळ ता. तुळजापूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ तालुका तुळजापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून मल्लिनाथ काळे विस्तार अधिकारी काक्रंबा बीट, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रियंका सचिन पाटील, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गणेश चादरे,केंद्रप्रमुख श्रीहरी लोखंडे, बारूळ गावचे सरपंच सिंधुताई सुपनार, पोलीस पाटील शिवाजी सगर, शहाजी सुपणार, उपसरपंच भास्कर सगट, बाबुराव ठोंबरे, सुभाष पाटील, संजय ठोंबरे, शा.व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, उपाध्यक्ष सुधीर लांडगे हे होते. यावेळी सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शाळेच्या गुणवत्ता व विविध उपक्रम राबवत असलेल्या बाबींची माहिती सांगितली व गावाने शाळेसाठी केलेल्या मदतीचाही उल्लेख यावेळी केला. त्यानंतर प्रियंका पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये बारूळ गावाच्या परंपरा त्याचप्रमाणे विद्यार्थिनी कलागुणां बरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. उच्च शिक्षण घेऊन आपले नाव कमवावे. असे सांगितले. वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमात एकूण 40 गाणी होती. त्यामध्ये लावणी, मनोरंजक गीते, लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते ,समाज प्रबोधनात्मक गीते, भक्ती गीते आधीचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गीताला प्रेक्षकांमधून भरपूर प्रतिसाद मिळत होता. तसेच उमेश सुर्वे यांनी विनोदी नकला ,उखाणे, नाट्यछटा ,शायरी सादर केल्या त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले आणि त्याला भरपूर प्रतिसाद ही मिळाला. बालाजी पवार यांनीही विद्यार्थ्यांचे गीताचे सादरीकरण करताना अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिन मुलाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वप्निल पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक सौदागर शेख, प्रियदर्शनी शाळेचे अतुल माळी,शिक्षिका रूपाली गडेकर नंदा मोरे सरोजनी जाधव कल्पना चव्हाण, वर्षा दुनगे,शितल भालेकर,शिक्षक बालाजी पवार, अमिन मुलाणी, वैभव सगर , अजित माळी, संध्या जेकेकुरे , गणपती कुंभार, नबिलाल शेख ,ग्रामस्थ आदींनी अतिशय मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केला.