परंडा (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी आपली कौशल्य विकसित केली पाहिजे तंत्रज्ञानाच्या युगात मोठ मोठ्या संधी उपलब्ध आहेत त्या संधीचे सोनं केलं पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी विशिष्ट स्वरूपाची कौशल्य आत्मसात केली पाहिजे तरच तुम्हाला विविध आस्थापनाच्या ठिकाणी नोकरीच्या संधी प्राप्त होतील असे प्रतिपादन परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी केले. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उद्योजक आस्थापना यांच्याकडे 212 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग महाराष्ट्र शासन.पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा अंतर्गत राज्यातील 15 खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक आस्थापना यांच्यामार्फत महाविद्यालयात मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये एकूण 15 आस्थापनांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी 244 बेरोजगारांनी नोंदणी केली त्यापैकी 153 पुरुषांची व 91 महिलांची नोंदणी झालेली आहे. एकूण 95 पुरुष व महिलांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे .यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव,श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव सुनील नाना शिंदे, कौशल्य विकास अधिकारी श्रीहरी सोळंके, उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, रोजगार मेळाव्याचे समन्वयक डॉ अरुण खर्डे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख व शिवाजी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर यांची उपस्थिती होती.कै.रा.गे.शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीराम फिलामेंट्स बार्शी येथील दीपक पाटील व पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी आपली मनोगत व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केला.पुढे बोलताना पोलीस निरीक्षक विनोद पवार म्हणाले की आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय म्हणून रा.गे. शिंदे महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय कटीबद्ध आहे.विद्यार्थ्यांनी याचा फायदा करून घ्यावा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करावा.चांगले तंत्रज्ञान विकसित करून घ्यावे.मिळेल त्या संधीचे सोने करावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले प्रास्ताविक संजय गुरव यांनी केले तर डॉ अरुण खर्डे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मुलाखतीसाठी आलेले जिल्ह्यातील तालुक्यातील युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी शासनाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले. तांत्रिक सहकार्य डॉ संतोष काळे व प्रा अमर यादव यांनी केले .