भूम (प्रतिनिधी)- महाशिवरात्रीनिमित्त भूम शहरातील कसबा विभागातील पुरातन महादेव मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .मागील दि 12 ते 26 फेब्रुवारी दरम्यान श्री शिवलीलामृत पारायण ग्रंथाचे वाचन व अर्थ सांगणे दररोज संध्याकाळी 8 : 30 ते 11 ग्रंथ वाचन व अर्थ सांगणे चालू आहे .महाशिवरात्री दिनी महा अभिषेक,  श्रीराम महाराज केज यांचे नारदीय कीर्तन,भजन त्यानंतर दूध प्रसाद,कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे व ता . 27 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महादेव मंदिर भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


 
Top