धाराशिव (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२५ असून,पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष समाज कल्याण आयुक्तालय,चर्च रोड,पुणे - ४११०११ येथे सादर करावेत,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
या योजनेची सविस्तर माहिती आणि जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.