धाराशिव (प्रतिनिधी)- पळसप येथे 10 व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे यांच्या संकल्पनेतून संविधान मंदिराची शिल्पाकृती उभारली होती. त्यामध्ये संविधानाची प्रास्ताविका उभारली होती व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतीय संविधान देत असतानाची शिल्पाकृती उभारली होती. तेथे साहित्य संमेलनात आलेल्या अनेकांनी संमेलनाचे आकर्षण ठरलेल्या शिल्पाकृती समोर उभा राहून फोटो काढले. यावेळी कवी संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. संध्या रंगारी, कवी संजय घाडगे, रमेश वाघमारे, अशोक मांदळे, करंजीकर, विजय गायकवाड.