परंडा (प्रतिनिधी) -शनिवार दि.1 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रम्हगांव ता.परंडा या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून ह.भ.प.ज्ञानदेव काजळेकर महाराज, पिंपळवाडीचे सरपंच विठ्ठल आप्पा लोकरे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते तथा केंद्रीय मुख्याध्यापक अरुण पाटील, मुख्याध्यापक रमेश नलवडे, केंद्रप्रमुख रविंद्र पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी इतिहासाचे रंग रुप हे....हे स्वागत गीत सादर केले*कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लहु मासाळ यांनी केले. तर सुत्रसंचालन सचिन गायकवाड व मुकुंद भोसले यांनी केले. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा चेअरमन रमेश बारसकर, पिंपळवाडीचे सरपंच हनुमंत गायकवाड, वडनेर सरणवाडीचे उपसरपंच नारायण सांगडे, पिंपळवाडीचे उपसरपंच रुपेश काळे, केंद्रप्रमुख महादेव विटकर, दत्तात्रय सोनवणे,युवराज खाडे, रामदास होरे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल झाडबुके, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष नागनाथ देशमुख, ज्योतिराम राऊत, संतोष वाघमारे, रामराव हुके, अंकुश डांगे, धन्यकुमार सुतार, विश्वास वाघमारे, शिवाजी वाघमारे, रघुनाथ कदम, गणेश भाग्यवंत सर,भारत गरड, रोहित चकोर यांची उपस्थिती होती.
उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष फुलचंद ओव्हाळ, उपाध्यक्ष महादेव हिंगणकर, सदस्य पोपट ओव्हाळ,अंगद लोंढे, नितीन मोहिते, संतोष बागल, तानाजी सांगडे,शाम लोंढे, मकरध्वज वाघमारे, सुधिर काळे यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ईशस्तव, देशभक्तीपर गीते,कविता,लावणी,गवळण,लोकगीते,शिवजन्मसोहळा, भक्ती गीते, कोळी गीते हिंदी फिल्मी गीते, खंडोबा गीते,गरबा डान्स, शेतकरी गीते, श्रीकृष्ण गीते, विनोदी बातमीपत्रे, उखाणे, विनोदी नाटिका सादर केल्या.कार्यक्रमासाठी ब्रम्हगांव व परिसरातील प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी होती.
विद्यार्थ्यानी सुंदर सादरीकरण करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.जवळ जवळ साडेतीन तासाच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी बक्षीसांचा वर्षाव करुन 29 हजार रूपये लोकवाटा जमा झाला. कार्यक्रमात हभप. ज्ञानदेव काजळेकर महाराज व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक लहु मासाळ, सहशिक्षिका सुषमा चव्हाण, अपेक्षा ओव्हाळ यांना “संत तुकाराम महाराज अभंग गाथा“ ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन व वेशभूषेचे काम सहशिक्षिका सुषमा चव्हाण व अपेक्षा ओव्हाळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुषमा चव्हाण यांनी केले.