कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट एस टी कामगार संघटनेच्या कळंब आगाराच्या अध्यक्षपदी सायस खराटे यांची तर सचिवपदी महेश थोरबोले यांची निवड करण्यात आली. 

कळंब आगारातील दत्त मंदिर येथे कामगार संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने हजर होते यावेळी जेष्ठ मार्गदर्शक राजाभाऊ कुंभार, उमाकांत गायकवाड,बळीराम कवडे महाराज यांनी मार्गदर्शन केले तर सदर मिटटिंग चे सूत्रसंचालन ऋषी पवार यांनी केले आणि अनिल बांगर यांनी सर्वांचे आभार मानले. यानंतर अनेक कर्मचार्यांनी संघटनेवर विश्वास ठेऊन सभासद होऊन पावत्या घेतल्या यानंतर नुतन पदाधिकारी यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चेतन गोसावी, माऊली कासार,गणेश काळे, इजास शेख,शशिकांत खोचरे,शिवाजी बांगर, रामलिंग जाधवर, गणेश इंगळे, अमृत वाघमारे,अशोक पाटील, बालाजी बोराडे,हनुमंत मुंढे, गोपीनाथ कांबळे,संदीप काळे, लव्हारे साहेब,शिवा कदम यांच्यासह इतर कर्मचारी मोठया संख्येने हजर होते.

 
Top