तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथील गेल्या २४ वर्षापासून सर्वसामान्य ग्राहकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरतपणे अर्थसहाय्य व मनोबल देणारी पतसंस्था म्हणून अग्रेसर असणारी आणि गरजू रुग्णांसाठी ब्लड बँक म्हणून अशी वेगळी ओळख असणारी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  संस्थेचे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे 24 वे वर्ष आहे संस्थेने आजवर अनेक रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे आजच्या या रक्तदान शिबिरा मध्ये ५५ रक्तदात्यांनी  रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता 

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे व्हा  चेअरमन श्रीकांत भोजने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव सज्जन जाधव संचालक  राजेंद्र माळी संजय व्हटकर श्रीकांत देशमाने शिवाजी गायकवाड  यांच्यासह संस्थेचे सभासद खातेदार ठेवीदार बहुसंख्य संख्येने हजर होते संस्थेने आजपर्यंत अनेक jसामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला आहे 

यावेळी संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याचा सत्कार करून सन्मान करण्यात आला 

Kशिबिरास सोलापूर रक्तपेढीचे सहकारी लाभले शिबिराच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अभिजित म्हेत्रे अश्विनी तांबे सुनील शेरेकर तानाजी फुलसुंदर भागवत गुंड जावेद शेख श्रीनिवास मुळे गणेश ठेले , आशिष भोजने, तुषार डोंगरे अशपाक सय्यद  मधुकर साळवे प्रवीण मोरे यांनी परिश्रम घेतले

 
Top