तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील उस्मानाबाद जनतासहकारी बँकेचे शाखाधिकारी दिनकर प्रभाकर हाके यांचे चिरंजीव हर्षवर्धन दिनकर हाके हा सध्या मॉडर्न कॉलेज पुणे येथे इंग्रजी माध्यम राज्यशास्त्र विषयात एम.ए. करत आहे. तो केंद्र सरकार मार्फत घेतलेल्या नेट परीक्षेमध्ये 300 पैकी 200 मार्क व 92.98% स्कोर घेऊन उत्तीर्ण झालेला असून तो असिस्टंट प्रोफेसर व पी.एच.डी. प्रवेशासाठी पात्र झाला आहे. हर्षवर्धन हा दहावीला 96% व बारावीला 77% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. त्याचे सर्व भागातून कौतुक होत आहे.