धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील श्री साई श्रद्धा एज्युकेशनच्या वतीने श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा.दीपक पुजारी हे विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.त्याबद्दल त्यांचा संस्थेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये नीट ऑनलाइन टेस्ट सिरीजचे संचालक प्रा.सोमनाथ लांडगे यांनी प्रा.दीपक पुजारी सर यांच्या 28 वर्षे सेवेचा गौरव पुर्ण उल्लेख केला.तसेच सरांच्या या सेवा काळात सरांनी अनेक गरजु व गोरगरीब मुलांना आर्थिक मदत करुन व अभ्यासासाठी मार्गदर्शन करुन यशस्वी केल्याचा उल्लेख केला.तसेच सरांना अध्यात्म, सांप्रदाय याबद्दल विशेष रुची असल्यानेच या कार्याला विशेष प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख केला. तसेच सरांनी नीट परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यास सुद्धा मदत केल्याचा प्रा.सोमनाथ लांडगे यांनी उल्लेख केला.यावेळी सरांना संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना पुजारी सर यांनी आपण आयुष्यात जे जे कार्य करतो ते ते लोकोपयोगी झाले पाहिजे.खऱ्या गरजु व्यक्तीच्या मदतीला आपण धावून गेले पाहिजे तर आयुष्याला सार्थकता प्राप्त होते असते असे सांगितले.तसेच विद्यार्थी अवस्थेमध्ये शॉर्टकट यश प्राप्त होत नाही.यश मिळवायचे असेल तर कष्टाला पर्याय नाही.जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.असा वसतिगृहाच्या मुलींना यशाचा मंत्र देऊन मुलींना त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सेवापुर्ती निमित्त सन्मान सोहळ्यासाठी सरांचे ज्येष्ठ चिरंजीव ॲड.प्रसाद पुजारी, सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे,मुलींच्या वस्तीगृहाच्या संचालिका उषाताई लांडगे,श्रद्धा लांडगे,ऋषिकेश लांडगे व पुजा वाकुरे,श्रद्धा शिंदे,मानसी देडे,स्वप्नाली भालेकर, वैष्णवी गायकवाड,श्रेया हापटे,अंकिता शिंदे,या वसतिगृहातील मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी मुलींच्या वसतिगृहाच्या संचालिका उषाताई लांडगे यांनी आभार व्यक्त केले.