धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 या अणदुर ते उमरगा महामार्गावरील चालू कामाची पहाणी करणेकरीता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 03:00 वा. आयोजित करण्यात आला आहे.

वरील महामार्गातील दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून काही ठिकाणी मोठयाप्रमाणात जिवीत हानी देखील झाली आहे. या पार्श्वभुमीवर दि. 06/01/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे दिशा बैठकीत ठरल्याप्रमाणे नळदुर्ग बायपास हा एकतर्फी कोणत्याही परीस्थितीमध्ये दि. 26/01/2025 पर्यंत सुरु करणार असल्याचे व उर्वरीत पुलाचे काम टप्याटप्याने करणार असल्याचे प्रकल्प संचालक यांच्याकडून अश्वासन देण्यात आले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब अणदुर येथील उड्डानपुल व नळदुर्ग येथील बायपास रस्त्याचे काम पहाणी येणेगुर,मुरुम, तुरोरी येथील उड्डानपुल व  उमरगा चौरस्ता येथील कामाची पाहाणी व वरील ठिकाण सुरु असलेल्या कामाचा आढावा घेणार आहेत.

  या पाहाणी दौऱ्यात पोलीस उपाधीक्षक तुळजापूर, पोलीस उपाधीक्षक उमरगा यांच्यासह पोलीस निरीक्षक नळदुर्ग, पोलीस निरीक्षक मुरूम, पोलीस निरीक्षक उमरगा, व संबंधित पोलीस अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे प्रकल्प संचालक व संबंधित कर्मचारी व ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच परीसरातील पत्रकार बांधव उपस्थीत रहावे असे आवाहन करण्यात आले.


 
Top