धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे डी. फार्मसी इन्स्टिट्युट, केशवनगर, उंबरे कोठा धाराशिव या अनुदानित कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन “फार्मा उत्सव 2025“ प्रेमाताई सुधिर पाटील सरचिटणीस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली व आदित्य पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डॉ. मंजुळा आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी तसेच कॉलेजच्या प्राचार्य डॉ. गोरख देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता मोठया उत्साहात आणि जलोषात पार पडले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोरख देशमाने यांनी करताना संस्थेने नविन बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाल्याबददल संस्थेचे अध्यक्ष व संस्था प्रमुखांच्या योगदानाचे विशेष उल्लेख केला. त्याबद्दल कॉलेजच्या वतीने प्रेमाताई पाटील व आदित्य पाटील आणि डॉ मंजुळा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. गोरख विश्वनाथ देशमाने यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून फार्मसी या विषयात पीएच.डी मिळल्याबददल  श्री. आदित्य पाटील यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  यावेळी सौ. प्रेमाताई सुधिर पाटील मॅडम यांनी कॉलेजच्या  प्रगतीचे कौतुक करून विदयार्थाना मार्गदर्शन केले. श्री. आदित्य पाटील यांनी कॉलेजच्या नवीन  भव्य इमारतीचे बांधकाम लवकरच पूर्ण करून विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन भाषणात दिले. तर डॉ. मंजुळाताई पाटील यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि अभ्यासाबरोबर खेळ तसेच स्वांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

फार्मा उत्सव 2025 या स्वांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी 2 तास विविध नृत्य, समूह नृत्य, लेझीम इत्यादि कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रुषीराज पिंपळे या विद्यार्थ्यांने “पुष्पा“ ही  वेशभुषा करून सादर केलेली कला सर्वांना आवडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मुस्कान शेख व अविष्कार कुंभार या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.साक्षी जगदाळे  यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. किरण अडचित्रे सर, श्नी. प्रशांत पवार सर,   श्री. वैभव सावंत आणि कॉलेजचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.

 
Top