धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. के. टी. पाटील संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या बी.सी.एस प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ते राज्याभिषेक यावरती वीस मिनिटांचे सुंदर असे नाटक सादर केले व त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विचार व्यक्त करताना डॉ. मसलेकर म्हणाले की, शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यकारक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लक्ष सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजी राजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. महाराज हे रणनीती धुरंदर, धैर्यवान, उत्कृष्ट नेतृत्व गुण, बुद्धिचातुर्य, सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन राष्ट्रीयत्वाची भावना सर्वात निर्माण केली. आत्मविश्वासाचे दुसरे महत्त्वाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.
यावेळी महाविद्यालयातील , प्रा.शुभम पाटील, प्रा.राघवेंद्र मुंढे , प्रा. पटेल मॅडम , प्रा. बधे मॅडम, प्रा. वराळे मॅडम,प्रा. कुलकर्णी मॅडम श्री अजय शिराळ, श्री राजाभाऊ जाधव,श्री प्रवीण पांचाळ, श्री. मणियार वकील विद्यार्थी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.