धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे आबा उर्फ अशोक अर्जुन पवार, रा. उमरा ता. कळंब जि. धाराशिव याने धाराशिव जिल्ह्यातील व बाहेर जिल्हृयातील बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणलेल्या आहेत. माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेने आरोपीला 10 मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे असलेल्या मोटरसायकली बाबत विचारपुस केली. त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासत घेवून चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटरसायकल ही त्याने बीड येथुन चोरुन आणली असल्याचे सांगीतले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा चुलता गोविंद व्यंकट पवार याचे सोबत मिळून आणखी बऱ्याच मोटारसायकली चोरुन आणल्या असुन उमरा येथे घरी एक मोटरसायकल आहे व इतर मोटरसायकल या घराचे जवळील तळ्याचे पाळीचे बाजूला झाडाझुडपात लपवून ठेवल्या आहेत असे सागिंतले. त्यावर पथकाने नमुद मोटरसायकल ताब्यात घेवून मोटरसायकल बाबत कोणत्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहे याबाबत अभिलेखाची पाहणी केली. सदर मोटरसायकल बाबत पोलीस ठाणे धाराशिव शहर, कळंब, तुळजापूर, बीड, गेवराई, मोहळ सोलापूर, विमानतळ पुणे शहर, सिंहगड रोड पुणे शहर, स्वारगेट पुणे शहर आदी ठिकाणी गुन्हे नोंद असुन दोन पंचा समक्ष आरोपी आबा उर्फ अशोक अर्जुन पवार याचे ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 10 मोटरसायकल एकुण 3 लाख रूपये किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस धाराशिव शहर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह जानराव, पोह निबांळकर, पोह वाघमारे,पोना जाधवर, पोना जाधवर, चालक पोह अरब, पोअं दहीहंडे, पोअं गुरव यांच्या पथकाने केली आहे.