तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील रोजगार हमीची बंद असलेली कामे चालू करणे अमीर शेख यांनी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले यांना निवेदन देवुन मागणी केली.
या बाबत निवेदनात म्हटले आहे कि, दिनांक 10/12 2024 रोजी रविंद्र ठाकरे कमिशनर यांनी पत्र काढून काम थांबवलेली होती. आपल्या जिल्ह्यात ज्या कामाचे कोड काढलेले आहे. असे आपल्या जिल्ह्यातील 700 ते 800 कामे सुरू करण्यात आलेले नाहीत. त्याबाबत मंत्री महोदयांना निवेदन देऊन रोजगार हमीची कामे चालू करावी. अन्यथा पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेताकडे जाता येता येणार नाही. पिकाची नेआन करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे रोहयो शेतरस्त्याची कामे चालू करा अशी विनंती केली.