तुळजापूर (प्रतिनिधी)- जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंच आयोजित “मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा 2025”आर्य चौक, तुळजापूर, दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी यंदाच्या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान साजरे केला जाणार आहे. अशी माहिती अध्यक्ष सुदर्शन इंगळे, अमोल कुतवळ, ए. टी. पोफळे, राजेश देशमूख यांनी पञकार परिषद घेऊन दिली.
शिवजन्मोत्सोव सोहळा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता: कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी चरणी महाअभिषेक, सकाळी 11 वाजता मंडळाचे जेष्ठ सभासदांच्या हस्ते ध्वजारोहण, सायं. 4 वाजता श्रीराम ढोल ताशा पथक यांची श्रींना मानवंदना, सायं. 5 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती उत्सव मूर्तिसि 108 महाकुंभांचा अभिषेक, 1008 सुवर्ण होणांचा अभिषेक आणि 1008 किलोंची पुष्पवृष्टी, सायं. 6 वाजता पारंपारिक वाद्यात श्री च्या मूर्तींचा प्रतिष्ठापणा सोहळा, सायं. 7 वाजता शिव शाहीर सुरेश जाधव (छत्रपती संभाजीनगर) यांचा पोवाडा. बुधवार, 19 फेब्रुवारी 2025 रोजजी सकाळी 8 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक व मानवंदना, नगर प्रदक्षिणा, सकाळी 11 वाजता “शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात“ या संकल्पनेने 501 मूर्तीचे घरोघरी वाटप, शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता पारंपारिक पध्दतीने भव्य मिरवणूक सोहळा. मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता महा-आरोग्य शिबीर असे कार्यक्रम होणार आहेत.